मकर संक्रांत २०२६ उत्साहात साजरी

मी मराठी फाऊंडेशनतर्फे जेपी नॉर्थ गार्डन सिटी (NGC) व विनय नगर परिसरातील मराठी कुटुंबांसाठी मकर संक्रांत २०२६ उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.

मकर संक्रांत हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वाचा सण. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या प्रेमळ संदेशासोबत या उत्सवाच्या माध्यमातून आपुलकी, स्नेह आणि सामाजिक एकोपा वाढवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.

या निमित्ताने परिसरातील महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून सणाचा आनंद द्विगुणित झाला.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत नाती अधिक घट्ट करण्याचा आणि समाजातील कुटुंबांना एकत्र आणण्याचा आनंद या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

मी मराठी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सण आणि सांस्कृतिक उत्सव साजरे करून मराठी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे.

या आनंदमय सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे, महिला भगिनींचे, स्वयंसेवकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी मराठी फाऊंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार!

मी मराठी फाऊंडेशन
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला… संस्कृती जपा, नाती जोडा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top